मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांचा मॅसेज घेऊन संजय कुटे सुरत मध्ये दाखल! एकनाथ शिंदे आणि संजय कुटेंची बैठक सुरू..!
Jun 21, 2022, 15:07 IST
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. काल रात्री पासून नाराज आमदारांचा गट घेऊन शिंदे गुजरात मध्ये पोहचले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे हे सुरत मध्ये दाखल झाले आहेत. शिंदे आणि कुटे यांच्यात सध्या बैठक सुरू असल्याचे कळते.
देवेंद्र फडणवीस यांचा मॅसेज घेऊन संजय कुटे हे सुरत मध्ये पोहचल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस हे आज सकाळीच दिल्लीत दाखल झालेले आहेत. दिल्लीत भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातही महाराष्ट्राच्या राजकारणावर बैठक झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.