मोठी बातमी! चिखलीत मनसेचा राडा; मुंबईवरून शेगावकडे जाणाऱ्या मनसे पदाधिकारी अविनाश जाधव , नितीन सरदेसाईंना पोलिसांनी चिखलीत अडवले; मराठवाड्याच्या हद्दीत सोडून देणार

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज, १८ नोव्हेंबरला जिल्ह्यात आहे. शेगाव येथील जाहीर सभेला खा. राहुल गांधी संबोधित करणार आहेत. दरम्यान राहुल गांधीनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विशेषतः मनसेचे राज्यभरातील पदाधिकारी शेगावमध्ये जात असताना पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. चिखलीत मनसेचे पदाधिकारी आणि पोलीस आमनेसामने आल्याचे पहायला मिळाले.

 मनसेचे नेते अविनाश जाधव , नितीन सरदेसाई शेगावकडे निघाले होते. दरम्यान त्यांना पोलिसांनी चिखली येथेच अडवले. चिखलीत मनसेच्या कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी मनसे कार्यालयाला पोलीस छावणीचे रूप आले होते. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलवली होती. दरम्यान पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले असून त्यांना मराठवाड्याच्या हद्दीत सोडून देणार असल्याचे वृत्त आहे.