मोठी बातमी! जिल्हापरिषद व पंचायत समित्यांची आरक्षण सोडत रद्द!! ओबीसींना हक्क मिळण्याची सुखद चिन्हे
Updated: Jul 13, 2022, 07:01 IST
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सुप्रिम कोर्टात काल, दाखल झालेल्या विशेष अनुमती याचिकेवरील सुनावणी मुळे आता राज्यातील २५ जिल्हापरिषद व २८४ पंचायत समित्त्यांची आज १३ जुलैला आयोजित आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. यामुळे ही सोडत किमान आठवडाभर पुढे ढकलली असतानाच ओबीसी बांधवांना आरक्षण मिळण्याची सुखद चिन्हे निर्माण झाली आहे.
राज्य सरकारने ओबीसी विषयक इमपीरिकल डेटा सादर केल्यावर १२ जुलै ला सुप्रिम कोर्टात विशेष याचिकेवर अर्जावर सुनावणी झाली. यावरील पुढील सुनावणी आता १९ जुलैला होणार आहे. यामुळे उध्या आयोजित आरक्षण सोडत बद्धल संभ्रम निर्माण झाला. दरम्यान काल, संध्याकाळी निवडणूक आयोगाने ही सोडत पुढील आदेशपर्यंत स्थगित केली आहे.
बुलडाण्यातही स्टे
दरम्यान यामुळे बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६८ व १३ पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी काढण्यात येणारी सोडत सुद्धा स्थगित करण्यात आली आहे. उप जिल्हाधिकारी ( निवडणूक) गौरी सावंत यांनी ही माहिती दिली. बुलडाणा तहसील अंतर्गतच्या ७ जीप व १४ पंचायत समिती गणासाठी काढण्यात येणारी सोडत सुद्धा स्थगित करण्यात आल्याचे तहसीलदार रूपेश खंडारे यांनी बुलडाणा लाईव्ह सोबत बोलताना सांगितले.