मोठी बातमी!श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचाही महाविकास आघाडीच्या धिरज लिंगाडेंना पाठींबा! शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी लिंगाडेंना पाठींबा देण्याचे केले आवाहन
शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी धिरज लिंगाडेंना विजयी करा: हर्षवर्धन देशमुख
१२ वर्षे त्यांना संधी देऊन बघितली, परिणाम काय झाला हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता पदवीधरांच्या, शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी धिरज लिंगाडे यांना मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. राज्यातील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान हे शिक्षकांचे महत्वाचे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांचे उत्तर आता धिरज लिंगाडेच आहेत असेही ते म्हणाले. पाठींबा दिल्याबद्दल लिंगाडे यांनी हर्षवर्धन देशमुख यांचे आभार मानत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
धिरज लिंगाडेंची बाजू भक्कम...!
महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांना विविध पक्ष संघटनांनी आतापर्यंत पाठींबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ , मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्यासह विविध संघटना लिंगाडे यांच्या पाठीशी आहेत. त्यातच अमरावती विभागात शाळांचे मोठे जाळे असलेल्या श्री.शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी पाठींबा जाहीर केल्याने लिंगाडे यांची बाजू बळकट झाली आहे.