शिवसेनेचे राज्यभरातील बडे नेते चिखलीत दाखल! नीलम गोऱ्हे, अंबादास दानवे, विनायक राऊत, अरविंद सावंत, नितीन देशमुख चिखलीत पोहचले; सभास्थळाची केली पाहणी;

 शेतकरी संवाद मेळाव्याला उद्या उद्धव ठाकरे करणार संबोधित

 
kjh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या,२६ नोव्हेंबरला चिखलीत शेतकरी संवाद मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी बुलडाणा जिल्हा शिवसेनेकडून करण्यात आली असून तयारी पाहता मेळाव्याला प्रचंड गर्दी होण्याचा पोलीस प्रशासनाचा अंदाज आहे. दरम्यान या मेळाव्याच्या पुर्वतयारीसाठी शिवसेनेचे राज्यातील बडे नेते आजच चिखलीत दाखल झाले आहेत. चिखली शहरातील ऐतिहासिक अशा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात हा भव्य संवाद मेळावा होणार आहे.

jadhav

    जाहिरात☝️

बंडखोरीनंतर व दसरा मेळाव्याच्या जाहीर सभेनंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे बंडखोरांचा ते ठाकरे शैलीत समाचार घेण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने ५० अधिकारी आणि ४०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान आज, २५ नोव्हेंबरला विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. विनायक राऊत, खा. अरविंद सावंत,  बाळापुरचे आमदार नितीन बापू देशमुख यांनी सभास्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. या शेतकरी संवाद मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी केले आहे.

jadhav

जाहिरात☝️