Big Breaking जिल्हा परिषद प्रभाग रचनांचा प्रस्ताव आयुक्तांना सादर ! पंचायत समिती गणाचाही समावेश ; ३१ मे पर्यंत अंतिम निर्णय
May 23, 2022, 17:13 IST
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बारकाईने पडताळणी करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव आज २३/५ च्या मुहूर्तावर विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. यावर आयुक्त ३१ मे पर्यंत निर्णय देणार आहे
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६८ आणि १३ पंचायत समित्यांच्या १३६ गणाची प्रभाग रचना यापूर्वीच करण्यात आली होती. या रचनाची जिल्हा कचेरीतील निवडणूक विभागात काटेकोरपणे पडताळणी व तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने हा प्रस्ताव आज ,२३ मे रोजी दुपारी उशिरा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केला.
२ पासून सादर करता येईल हरकती
दरम्यान ३१ मे पर्यंत आयुक्त याला मान्यता देणार असून २ जूनला जिल्हाधिकारी रचना प्रसिद्ध करणार आहे. या रचनावर जिल्हाधिकारी यांच्याकडे २ ते ८ जून दरम्यान हरकती व सूचना सादर करता येतील. सुनावणी अंती विभागीय आयुक्त जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गण २२ जून पर्यंत अंतिम करतील. २७ ला अंतिम प्रभाग रचना राजपात्रात प्रसिद्ध करण्यात येईल.