Big Breaking ! अखेर ' जमुनेत' घोडे न्ह्यायले!! मुकुल वासनिक होणार खासदार... पण राजस्थान मधून

 
mukulvasni
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  अखेर गंगेत घोडे न्ह्यायले ही अस्सल मराठमोळी म्हण आहे. ती ज्येष्ठ काँग्रेसी नेते मुकुल वासनिकांच्या बाबतीत दीर्घ ब्रेक के बाद लागू झाली! फरक दोनच आहेत, त्यांचे घोडे प्रत्यक्षात राजधानी दिल्लीच्या कुशीत वाहणाऱ्या जमुनेत न्ह्यायले असून त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली ती हक्काच्या महाराष्ट्र मधून नव्हे तर राजस्थान मधून ! आता काही असो,  ते राज्यसभा खासदार होणे हे नक्की !! त्यामुळे पुढील दौऱ्यात ते त्यांना राजकीय दृष्ट्या (अती) मोठे करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात जेव्हाही येतील तेंव्हा खासदार बनुनच येतील हे अटळ सत्य आहे...

राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका लागल्या असून त्यासाठी पुन्हा एकवार  राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचे नाव चर्चेत होते. यामुळेच या घडामोडी वर अति दूरवरच्या बुलडाणा जिल्ह्यातून बारकाईने नजर ठेवून असणाऱ्या बुलडाणा लाईव्ह ने २६ मे रोजी ' नुसतीच आशा... अपेक्षा...

चर्चाच की संधी'  या शीर्षक अंतर्गत विशेष वृत्त प्रसारित केले होते. सध्याच्या  बिकट राजकीय परिस्थिती चे बारकाईने विश्लेषण करता वासनिकांना यंदा संधी मिळणार हा बुलडाणा लाइव्ह चा कॉन्फिडन्स होता.  तो अचूक, सार्थ  आणि परफेक्ट ठरला !  मात्र राजकीय आणि सामाजिक तडजोडीपायी वासनिकांना राजस्थान मधून ऍडजस्ट करण्यात आले. बुलडाणा लाइव्हच्या त्या वृत्ताप्रमाणे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तामिळनाडू मधून उमेदवारी देण्यात आली.  मात्र महाराष्ट्र मधून ऐनवेळी इम्रान प्रतापगढी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले! (ती ऐन वेळची तडजोड की राजस्थान मध्ये हमखास ग्यारंटी म्हणून तिथून वासनिकांना संधी देण्यात आली हे प्रभू किंवा पक्ष श्रेष्ठी च जाणो)  ...