Big Breaking! जिल्हा परिषद प्रभाग रचनावर हरकतींचा खच!! आता थेट कमिशनर सायबांकड होणार सुनावणी !

 
 बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हापरिषदेच्या ६८ मतदारसंघाच्या प्रारूप प्रभाग रचनावर अंतिम मुदतीत  जिल्हाधिकाऱ्यांकडे मोठ्या संख्येने आक्षेपवजा हरकती घेण्यात आल्याने निवडणूक यंत्रणांची दमछाक उडाली! काल, ८ जूनच्या अंतिम मुदतीअखेर तब्बल ५१ हरकती करण्यात आल्याचे खळबळजनक वृत्त आहे. 

जिल्हा परिषदेच्या ६८ गट तर १३ पंचायत समित्यांच्या गणाच्या प्रारूप प्रभाग रचना २ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन त्यावर हरकती मागविण्यात आल्या. ८ जून या अंतिम मुदतीत जिल्ह्यातील  ५ तालुके वगळता अन्य ८ तालुक्यातुन हरकतींचा खच पडला! बुलडाणा तालुक्यातुन सर्वाधिक म्हणजे तब्बल १५, त्याखालोखाल मेहकर मधून १३ तर खामगाव मधून ९, नांदुरा मधून ५ , चिखली मध्ये ४ हरकती प्राप्त झाल्या. मलकापूर व शेगाव प्रत्येकी  २ तर मोताळा १  अशी अन्य तालुक्यातील आकडेवारी आहे.
  
२२ जून पर्यंत सुनावणी

 दरम्यान या ५१ हरकतींवर विभागीय आयुक्त पियुष सिंह सुनावणी घेणार आहे. २२जूनपर्यंत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण अंतिम होणार आहे. २७  जून पर्यंत  हे मतदारसंघ शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे  नियोजन आहे