बिग ब्रेकिंग! १२ जुलैला आरक्षण सोडत रद्द अन ...१८ ला झेडपीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर!! २५ पर्यंत सादर करता येईल हरकती

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी)  सुप्रिम कोर्टात दाखल झालेल्या विशेष अनुमती याचिकेवरील सुनावणी मुळे  राज्यातील २५ जिल्हापरिषद व २८४ पंचायत समित्त्यांची  १३ जुलैला आयोजित आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली होती . मात्र आता निवडणूक आयोगाने बुलडाण्यासह राज्यातील  १० जिल्हापरिषदाचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर केलाय! त्यानुसार जिल्हाधिकारी  कार्यालय  व १३ तहसील कार्यालयात आज, २० जुलैला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. 

हा कार्यक्रम १० जिल्हापरिषद व ११९ पंचायत समित्यांसाठी असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. यासाठी ३१ मे २०२२ रोजीची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. आज ही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर २५ जुलै पर्यंत हरकती, सूचना सादर करता येतील. २९ ला याद्या अधिप्रमाणित करण्यात आल्यावर मतदान केंद्रांची यादी व केंद्र निहाय मतदार यादी ८ ऑगस्टला प्रसिध्द करण्यात येणार आहे.