बिग ब्रेकिंग! चालू वर्षात रंगणार २९० ग्रामपंचायतींचा रणसंग्राम! प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर ; ग्रामविकास खात्याचेआदेश

 
jilhadhikari
 बुलडाणा (विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चालू वर्षात जिल्ह्यातील तब्बल २९० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा थरार रंगणार हाय! याची पूर्वतयारी म्हणून  ग्रामविकास खात्याने प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला असून  निवडणूक यंत्रणा कामाला लागल्या आहे. 

 जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान मुदत संपलेल्या राज्यातील १८४९ तर डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान मुदत संपणाऱ्या ६७४७ ग्रामपंचायतीसाठी हा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील २९० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली  ही प्रभाग रचना करण्यात येईल.  घोषित कार्यक्रमानुसार तहसीलदार ९ मे २०२२ पर्यंत गुगल अर्थच्या मदतीने गावाचे नकाशे अंतिम करतील. १३ मे पर्यंत तलाठी, ग्रामसेवक संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणार आहे

. तहसीलदार, गटविकास अधिकारी व मंडळ अधिकारी १९ पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करतील. सदर रचनेचे प्रस्ताव एसडीओ मार्फत २४ मे पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करतील. ३१
मे पर्यंत जिल्हाधिकारी रचना व आरक्षण ची तपासणी व दुरुस्त्या करून मान्यता देणार आहे.३ जून पर्यंत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील  समिती दुरुस्त्या करून याला मान्यता देतील.

हरकती, सूचना...

दरम्यान ६ जून पर्यंत प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिल्यावर १४ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येतील. यावर एसडीओ २४ जूनपर्यंत सुनावणी घेणार असून अंतिम निर्णयासाठी २९ जूनपर्यंत  जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करतील. १ जुलै पर्यंत प्रभाग रचना व आरक्षण अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करणार आहे. ५ जुलै रोजी रचनेला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.