भारत जोडो यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ! आज जळगाव जामोद, निमखेडी मार्गे मध्यप्रदेशात जाणार! बुलडाणा लाइव्ह वर पहा लाइव्ह

 
gandhi
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज, २० नोव्हेंबरला जिल्ह्यातला तिसरा दिवस आहे.१८ नोव्हेंबरला ही यात्रा जिल्ह्यात आली होती. त्याच दिवशी शेगाव येथील जाहीर सभेला राहुल गांधींनी संबोधित करून शेगावात मुक्काम केला होता. काल, १९ नोव्हेंबरला जलंब, भास्तन मार्गे जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे यात्रेचा मुक्काम होता. दरम्यान आज, २० नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता भेंडवळ येथून यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आहे.सकाळी १० वाजता यात्रा जळगाव जामोद येथे पोहचेल. सातपुडा एज्यूकेशन सोसायटी येथे यात्रेची दुपारची विश्रांती राहणार आहे. त्यानंतर निमखेडी मार्गे यात्रा मध्यप्रदेशात जाणार असून  आजचा मुक्काम मध्यप्रदेशातील सीतापूर, बोदरली,बऱ्हाणपूर येथे राहणार आहे. बुलडाणा लाइव्ह वर पहा यात्रा लाइव्ह..