BULDANA LIVE SPECIAL: राज्यात राजकीय, देऊळगाव राजात प्रशासकीय संभ्रम! पालिका निवडणूक होणार की स्थगिती मिळणार?

 
parished
 बुलडाणा (संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  महाबंड,  सत्तांतर, बहुमत चाचणी, सरकार स्थापन झाले असले तरी मंत्री मंडळ विस्तार, आमदार अपात्रता बद्धल कमालीचा राजकीय संभ्रम असताना आटपाट बालाजी नागरी अर्थात देऊळगाव राजा पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणूक बद्धल प्रशासकीय संभ्रम निर्माण झाल्याचे मजेदार चित्र आहे.  जिल्हापरिषदांच्या  आरक्षणाला स्टे मिळाल्याने  ही निवडणूक होणार की त्यालाही स्थगिती मिळणार ? असा यक्ष प्रश्न ऐरणीवर आलाय!

राज्यात राजकीय अस्थिरता असून  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सारं काही अवलंबून असल्याचे चित्र आहे. या  धामधूमित   राज्य निवडणूक आयोगाने  राज्यातील 92 पालिकांचा निवडणूका जाहीर करून सर्वांनाच  जोरका धक्का धिरेसे दिला.  यामध्ये जिल्ह्यातील केवळ देऊळगाव राजा पालिकेचा समावेश आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येणार असून नामनिर्देशन पत्र आयोगाच्या वेबसाईटवर 22 ते 28 जुलै दरम्यान उपलब्ध राहणार आहे. अर्ज स्वीकारण्याची हीच मुदत असून

सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान अर्ज सादर करता येणार आहे. या अर्जांची छाननी 29 ला करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अपील नाही तिथे 4 ऑगस्ट पर्यंत माघार घेता येणार आहे. अपील असेल तिथे निकाल लागल्या पासून 3 दिवसात पण 8 ऑगस्ट पूर्वी कारवाई करावी लागणार आहे. माघारच्या शेवटच्या दिवशीच्या लगतच्या दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 18 ऑगस्टला सकाळी 7.30 ते 5.30 वाजे दरम्यान मतदान घेण्यात येणार असून  19 ला निकाल जाहीर होणार आहे. असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 
 
 या निवडणुकीची जय्यत पूर्व तयारी करण्यात आली आहे. प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादी अन मतदान केंद्राचे निर्धारण असे सोपस्कार पार पडले आहे. मात्र आरक्षण हे ओबीसी वगळून करण्यात आले ही  बालाजी नागरीरील प्रशासकीय अन राजकीय संभ्रम चे मुख्य कारण आहे. 12 जुलैला झालेल्या ओबीसी विषयी विशेष अनुमती याचिकेवरील सुनावणी झाली असून पुढील सुनावणी 19 तारखेला आहे.  या कारणामुळे 25 जिल्ह्यात निघणारी झेपीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली. यामुळे घटनात्मक पेच टाळण्यासाठी या

 निवडणूकिला देखील स्टे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुप्रिम ची  पुढील सुनावणी 19 जुलैला तर 22 पासून देऊळगाव राजा पालिकेसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. यामुळे राज्य शासन वा निवडणूक आयोग 92 पालिकांच्या निवडणूक संदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आज अखेर यासंदर्भात कोणतेही निर्देश प्राप्त झाले नसल्याचे नगर प्रशासन च्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. यापरिनामी देऊळगाव राजामध्ये  21 जागांसाठी च्या लढतीबद्धल उत्साह कमी अन संभ्रम जास्त असे सध्याचे मजेदार चित्र आहे