BULDANA LIVE SPECIAL: आता म्हणे २० जुलैचा मुहूर्त! लघु मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातल्या 'फोर एस' पैकी कुणाला संधी?

 
mahale
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जून महिन्याच्या अखेरच्या दिवशी सत्तांतर होऊन  भाजपा- शिंदे गटाचा शपथविधी पार पडला. याला १७ उलटूनही विस्तार होत नसल्याने तो खमंग चर्चा आणि टीकेचा विषय ठरला असतांनाच आता २० जुलै या नवीन मुहूर्ताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झालंच तर  जिल्ह्यातील अन चर्चेतील 'फोर एस' पैकी कोणाची (अन किती जणांची) वर्णी लागणार ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

bade

राज्यमंडळाचा विस्तार आता चर्चा, टिके पुरताच मर्यादित राहिला नसून  केवळ मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री असे दोघेच जण असणे राज्यघटनेतील तरतुदी लक्षात घेता विसंगत असल्याचा मुद्दा सामोरे आलाय! यावरून राजकारण पेटले असतानाच २० तारखेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित विस्तार होणार अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे हा मुहूर्त ( तरी नक्की) असे गृहीत धरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळासह राजकारणप्रेमी जिल्हावासियात देखील चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

  अर्थात सध्याही जाणकार व सामन्यांच्या चर्चेत 'फोर एस'  अर्थात  संजय कुटे, संजय  रायमूलकर,  श्वेताताई महाले, संजय गायकवाड   हेच आमदार आहेत. आमदार आकाश फुंडकर यांच्या नावाची चर्चा अपवादानेच होत असून ती नसल्यासारखीच आहे. नवीन मुहूर्त चर्चेत असला तरी संभाव्य विस्तार हा मर्यादित राहणार .  त्यात दोन्ही गटाचे  प्रत्येकी ५ वा फार झाले तर ६ जणांचा अशी उप चर्चा देखील होत आहे. यामुळे व प्रचंड स्पर्धा लक्षात घेता,  या मिनी विस्तारात किती जण ऍडजस्ट होऊ शकतात हा यक्ष प्रश्न आहे.
 
  यामुळे या पहिल्या विस्तारात आमदार संजय कुटे यांच्या समावेशाची कमाल शक्यता आहे. सार काही सुरळीत झालं तर त्यांना कॅबिनेट सह पालकमंत्री पदाची लॉटरी लागणार हे उघड आहे. प्रतापगड मधील हालचाली, मते मतांतरे, हवा, पुढील राजकारण लक्षात घेतली तर आ. रायमूलकर हे शक्यता आणि स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. फक्त त्यांना राज्यमंत्री पदावर समाधान मानण्याची वेळ येऊ शकते. 

आणि धक्कातंत्र...!

दरम्यान अपेक्षित शक्यतेची समीकरणे  वरीलप्रमाणे असली तरी भाजपाचे धक्कातंत्रा चे धक्कादायक राजकारण पाहिले तर ती शक्यता देखील नाकारता येत नाही. दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यामुळे डेप्युटी ठरले! ही अघोषित पात्रता रिपीट झाली तर विदर्भ- मराठवाड्यातील एकमेव महिला आमदार व बहुजन समाज या निकषावर श्वेता महाले पाटील यांची लॉटरी लागू शकते. मिशन -४५ अंतर्गत त्यांच्या नावाची चर्चा अधूनमधून होत राहते. हे दिल्लीश्वरांच्या मनात किंवा योजनेत असेल तर ही शक्यता बळावते. आपण मंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले असले तरी मित्र पक्षाच्या धक्कातंत्रा ची लागण शिंदे गटालाही लागली असेल तर त्यांना लाल दिवा मिळू शकतो. महाबंडातील त्यांची भूमिका, आक्रमक वावर, मुख्य मंत्र्यांचा  त्यांच्यावरील गाढ विश्वास हे फॅक्टर महत्वाचे ठरू शकतात. अर्थात विस्तारच जर तरचा, शक्यतेचा विषय असल्याने लाल दिव्याची समीकरणे , चर्चा देखील शक्यता या शब्दाभोवती फिरणारीच आहे. निष्ठा, श्रद्धा या शब्दाप्रमाणेच जाणकार, सूत्र, माहितगार हे शब्दही अलीकडे निराधार, चुकीचे ठरले आहे, नाही का?...