BULDANA LIVE SPECIAL : जिल्हापरिषद निवडणुकीत राहणार 15 लाखांवर मतदार! नारीशक्तीही ठरणार निर्णायक!! 8 ऑगस्टला फायनल होणार मतदारसंख्या

 
jilhaparishad
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नजीकच्या काळात होऊ घातलेल्या बुलडाणा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकित 15 लाखांच्या आसपास मतदार 204 मेम्बर ठरविणार आहे. यामध्ये महिलांचे निर्णायक मतदान असून 8 ऑगस्टला मतदारांची संख्या अंतिम होईल. यामुळे शेकडो भावी सदस्यांसाठी ही तारीख लक्षवेधी ठरली  आहे.

बुलडाणा जिल्हापरिषदेच्या 68 गट व 13 पंचायत समित्यांच्या 136 गणासाठीच्या संभाव्य निवडणुकीची जय्यत पूर्वतयारी करण्यात येत आहे. आज मतदार याद्या तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रारूप मतदार यादीत 15 लाख 93 हजार 723 मतदारांचा समावेश आहे. यामधील बाप्प्यांची( पुरुष मतदारांची) संख्या 8 लाख 42 हजार 468 इतकी असून महिलांचे मतदान 7 लाख 51  हजार 250 इतके आहे.  यामध्ये ' इतर' 5 जणांचा देखील समावेश आहे. अर्थात पडताळणी,  हरकती व सुचनानंतर ही संख्या काहीशी कमी होऊ शकते. ही शक्यता गृहीत धरली तरी झेडपीच्या रणसंग्रामात तब्बल 15 लाखांच्या आसपास मतदार राहणार आहे, हे नक्की. 

मतदारसंख्या सारखीच असे नाय!

मात्र  68 झेडपी गट किंवा 136 पंचायत समिती  गणांची मतदार संख्या समानच असेल असे नाही, हे येथे उल्लेखनीय.  वानगीदाखल सुलतानपूर गटाची प्रारूप मतदार संख्या 24 हजार 52 ,   जामोदची 22 हजार 410, गणेशपूर गटाची 18 हजार 900 इतकी आहे. यामुळे उमेदवारांचा खर्च, वेळ आणि  परिश्रम मतदार गट नुसार कमी वा जास्त होणार आहे..