BULDANA LIVE SPECIAL! ३४ खुल्या जागांसाठी राहणार प्रचंड चुरस! ओबीसींना मिळाल्या हक्काच्या १७ जागा!! बुलडाणा झेडपीचे चित्र !

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):६८सदस्यीय बुलडाणा जिल्हा परिषदेच्या संभाव्य लढतीचे चित्र प्राथमिक चित्र आज  काढण्यात आलेल्या सोडतीअंती स्पष्ट झालंय! तब्बल ३४ जागा सर्वांसाठी खुल्या झाल्याने या गटात प्रचंड चुरस राहणार हे आत्ताच स्पष्ट झाले आहे. तसेच ओबीसींना १७ जागा राहणार हे स्पष्ट झाल्याने बुलडाणा लाइव्ह ने व्यक्त केलेले भाकीत अचूक ठरले. 

आज पार पडलेल्या सोडती अंती अनुसूचित जातिकरिता १४ जागा तर ४ जागा जमाती करिता जागा निघाल्या  आहे. यामुळे काही ठिकाणी दिग्गज नेते, माजी सदस्यांचे मनसुबे उध्वस्त झाले! यामुळे त्यांना दुसरा मतदार संघ  शोधण्याची वेळ आली आहे. ओबीसींना १७ जागा मिळाल्याने अठरा पगड जातींना राजकीय जीवदान मिळाले आहे.  या जागांवरही  तीव्र चुरस राहणार हे उघड आहे. 
एकूण जागा - ६८
ओबीसी- १७
एससी- १३
एसटी- ४
सर्वसाधारण- ३४
छायाचित्र - आरक्षण चिठ्ठ्या काढणारी अक्षरा नितीन पडोळ