BULDANA LIVE SPECIAL! देऊळगाव राजाच्या स्थगित रणसंग्रामाचा फैसला सुप्रिम कोर्टात!! नवीन खंडपीठासमोर होणार सुनावणी

 
parished
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बालाजी नगरी अर्थात देऊळगाव राजा पालिकेच्या अर्ध्यावर स्थगित झालेल्या निवडणुकीचा फैसला आता आयोग, शिंदे सरकार नव्हे तर थेट सुप्रिम कोर्ट करणार हाय!...

होय! सुप्रिम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या राज्य सरकारने यासाठी आता सुप्रिम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. देऊळगाव राजासह राज्यातील 92 पालिका आणि 4 नगर पंचायत च्या निवडणुका ओबीसी आरक्षण शिवाय घ्यायच्या किंवा नाही याचा फैसला आता नवीन खंडपीठ घेणार आहे. न्यायमूर्ती खानविलकर  निवृत्त झाल्याने नवीन खंडपीठाकडे या याचिकेची सुनावणी होणार आहे. सर न्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी हे स्पष्ट केले. 

दरम्यान देऊळगाव राजासह 92 पालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 21 जागांसाठी 22 जुलै पासून उमेदवारी अर्ज आणि 18 ऑगस्टला मतदान असा हा कार्यक्रम होता. मात्र आता या निवडणुका चांगल्याच लांबणीवर पडणार आहे.