BULDANA LIVE EXCLUSIVE: पावसाच्या अंदाजावर आधारीत निवडणुकचा प्रयोग जिल्ह्यातही होणार ! ५ ठिकाणी लढतीची ट्रायल !! 'निकाल' जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निर्णायक?

 
बुलडाणा (संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सुप्रिम कोर्टाच्या  'त्या' निकालानंतर  ऍक्टिव्ह मोडवर आलेल्या राज्य निवडणूक आयोगाने अखेर पर्जन्य अंदाजावर आधारित निवडणुकीचा धाडसी व बुंमऱ्यांग  होऊ शकणारा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतलाच ! बुलडाणा जिल्ह्यातील २ तर राज्यातील  ६२ तालुक्यात  ही ट्रायल ठरणारी निवडणूक भर पावसाळ्यात रंगनार हाय!  ही निवडणूक संभाव्य  जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांच्या दृष्टीने निर्णायक  ठरणार आहे

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जिल्हापरिषद निवडणूक संदर्भात १७ मे २०२२ रोजी दिलेल्या निकालात पावसाच्या अंदाजावर आधारित अर्थात पावसाची मागील आकडेवारी लक्षात घेऊन अहवालाच्या आधारे  निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्या. राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत राज्यातील  जिल्हा यंत्रणांकडून पावसाच्या आकडेवारीचे अहवाल मागविले. या अफलातून प्रयोगासाठी प्रायोगिक तत्वावर ग्रामपंचायत निवडणूक ची  निवड करण्यात आली.

राज्यातील ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायत क्षेत्रात मागील काळात कमी पाऊस झाला असा अहवाल असल्याने तिथे विलक्षण इलक्षण होणार आहे। यामध्ये  मलकापूर मधील उमाळी, बेलाड, आळंद आणि खामगाव मधील खामगाव ग्रामीण व पिंप्री धनगर ग्राप चा समावेश आहे. यासाठी ४ ऑगस्टला मतदान होणार असून या लढतीचा व प्रयोगाचा निकाल ५ ऑगस्टला कळणार आहे.