BULDANA LIVE EXCLUSIVE! स्व. दिलीपराव रहाटेंचे चिरंजीव म्हणतात आदित्य ठाकरेंना भेटलो; शिवसेना सोडण्याचा विचारही करू शकत नाय! झेडपीच्या तयारीत; जनसामान्यांचा मिळतोय प्रचंड पाठिंबा!

 
ghj
बुलडाणा( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ८० च्या दशकात जिल्हा शिवसेना म्हणजे दिलीपराव रहाटे आणि रहाटे म्हणजे सळसळत्या भगव्या उत्साहाने वावरणारा मर्द मावळा आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारा सैनिक! त्यांचे १६ मार्च १९८९ ला अकाली निधन झाले नसते तर मेहकर मतदारसंघच नव्हे जिल्हा शिवसेनेचाही इतिहास वेगळा असता...

आज निधनाला ३ दशकापेक्षा जास्त( ३३ वर्षांचा) काळ उलटूनही स्व. दिलीपरावांचे वलय, जादू, जनमानसातील प्रभाव  साक्षात काळ सुद्धा पुसू शकला नाहीये! ते गेल्यावर त्यांच्या सर्वोत्तम शिष्यवजा सहकाऱ्याने राजकीय प्रगतीचे पल्ले गाठले खरे पण योगायोगाने ३ दशकानंतर सेनेचा त्याग केला. जीवन( मग त्यात राजकारणही आलेच) हे  परिवर्तन शिल असते, इतिहासाची पुनरावृत्ती होते , दुनिया गोल है असे सांगितलं जातं. आता याची प्रचिती येण्याची चिन्हे आहे, त्याची चाहूल लागत आहे. मेहकरचा एक महत्वाचा केंद्रबिंदू "रहाटे नाव अन शेंदला हे गाव" होणार अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

इतिहास तोच पण मोठा फरक म्हणजे रक्ताचे नाते असणारे ,प्रतापराव जाधव व आशिष रहाटे ही नावे (केवळ आणि केवळ राजकारणात) समोरासमोर उभे ठाकणार आहे. खासदार शिंदे गटात गेले आणि झेडपी  मेम्बर असलेले  रहाटे ज्युनिअर  शिवसेनेतच राहण्यावर ठाम. ( मागील लढतीत अंजनी बुद्रुक गटातून विजयी झाले. जिल्ह्यातील सर्वाधिक लीड ने निवडून येणाऱ्या यादीत ते  उमाताई तायडे यांच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरवर होते ). नावाप्रमाणेच प्रतापी असणाऱ्या खासदारांनी कोणतेच राजकीय रेकॉर्ड बाकी ठेवले नाही, खासदार आणि आमदारकीची हॅट्ट्रिक साधण्याची किमया करणारा असा दुसरा नेता विदर्भात तरी नसावा!...
 
 त्यामुळे खा. जाधव आणि आशिष नावाचा युवानेता यांच्यातील संभाव्य मुकाबला वरकरणी जरी विषम वाटतो, काहींच्या दृष्टीने तो निरर्थक , हास्यास्पद ही ठरू शकतो. पण प्रतापगड च्या इतिहासाची पाने उलटली तर ९० च्या दशकातील आमदार सुबोध सावजी विरुद्ध प्रताप जाधव हा सामना ही असाच वाटत होता. त्यामुळे प्रत्येकाचा एक काळ असतो, चढ असला म्हणजे उतार असतोच हे सिद्ध झाले.

काय म्हणतात आशिषभैय्या...

 या अनुषंगाने आऊट ऑफ डिस्ट्रिक्ट असलेले आशिष रहाटे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपण शिवसेना सोडण्याचा विचारच करू शकत नाही.   सेनेचेच काम करीत राहणार असून पडझडीनंतरही पक्ष वाढीचे काम करीत राहणार आहे. निष्ठा यात्रेदरम्यान युवानेते आदित्य ठाकरे यांच्यासमवेत धावती भेट झाल्याची कबुली देतानाच  सविस्तर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा प्रमुख बळीराम मापारी यांच्या मुळे स्पेस निर्माण झाली असली तरी जी जवाबदारी मिळेल ती सांभाळू असे ते म्हणाले.  सध्या एक निष्ठावान सैनिक या नात्याने  ८ जीप गटांमध्ये लढत देण्याची आणि मोठ्या विश्वासाने  आणि संख्येने भेटणाऱ्या सैनिक व कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले. लोकांचे पाठबळ मिळते. इतर निष्ठावान पदाधिकारी समवेत काम करतोय असे त्यांनी विनम्रपणे सांगितले. खासदारांशी होणारा संभाव्य मुकाबला वगैरे भविष्यातील तर्क आहेत, ते सर्वार्थाने मोठे आहेत एवढेच सांगून त्यांनी या विषयाला बगल दिली.