BREAKING बुलडाणा तालुक्यातील जिप, पंसची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध ; ७ जिप , १४ पंचायत समिती मतदारसंघात बदल नाय!
नवीन गटाचे नाव ढालसावंगी असे असून मागील निवडणूकीतील रायपूर, साखळी, मासरूळ जीप गटातील काही गावांचा यामध्ये समावेश आहे. गावांच्या संख्येच्या दृष्टीने हा गट तालुक्यातील सर्वात मोठा गट होय. यामधील ढालसावंगी या पंचायत समिती गणात साखळी खुर्द , केसापूर, हतेडी बुद्रुक, आवळखेड, हतेडी खुर्द, तांदुळवाडी, इस्लामपूर, चिखला, दुधा, देवपूर, ढाल सावंगी, या गावांचा समावेश आहे. दहिद खुर्द या गणात अंभोडा , झरी, दहिद बुद्रुक, पलसखेड नाईक व नागो, पाडली, गिरडा, गोंधनखेड, इजलापूर, मेरखेड, चौथा, दहिद खुर्द, अटकळ ही गावे समाविष्ट आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या देऊळघाट जीप गटातील सागवान गटात जांभरून, कोलवड व सागवान या तर देऊळघाट गणात बिरसिंगपूर, देऊळघाट, दत्तपुर, अफजलपूर, उमाळा ही गावे आहे.
सावळा (सुंदरखेड) गटातील डोंगरखंडाळा गटात भादोला, वरवंड, गोंधनखेड,पिंपरखेड, देव्हारी, डोंगर खंडाळा तर सावळा गणात हनवतखेड, सावळा, सुंदरखेड, बोरखेड, पलढग, तारापूर ही गावे समाविष्ट आहे. साखळी जिप गटाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. साखळी बुद्रुक गण- शिरपूर, नांद्रा कोळी, साखळी बुद्रुक. येळगाव गण- मालविहिर, रुईखेड टेकाडे, खेर्डी, पोखरी, सव, अंतरी तेली, खुपगाव, येळगाव, अजीसपूर. मासरूळ गटात सातगाव म्हसला गण- सोयगाव, पांगरखेड, धामणगाव, डोमरूळ, टाकळी, वरुड, कुंबेफळ, सातगाव म्हसला, कुलमखेड, मौढाला. मासरूळ गण- मढ, जनुना, गुम्मि, जामठी, शेकापूर, तराळखेड, मासरूळ. धाड गट मधील चांडोल गणात म्हसला बुद्रुक, बोदेगाव, म्हसला खुर्द, इरला, चांडोल, जांब, ढंगारपुर ही गावे आहेत. धाड गणात धाड, बोरखेड, करडी, सावली ही गावे आहे. रायपूर जिप गटातील पिंपळगाव सराई गणात रुईखेड मायमबा, मोहोज, भडगाव, घाटनांदरा, ढासाळवाडी, पलसखेड भट , पिंपळगाव सराई तर रायपूर गणात पिपळगाव सराई, सिंदखेड मातला, उमरखेड, रायपूर, पांगरी, माळवंडी या गावांचा समावेश आहे.