BREAKING आ.संजय गायकवाड बुलडाण्यात पोहचले! कार्यकर्त्यांना संबोधित करणार! पत्रकारांशी साधणार संवाद!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या दिवसापासून असलेले बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आज, ५ जुलै रोजी बुलडाणा शहरात दाखल झाले आहेत.

१८ जून पासून ते मुंबईत होते. २०जून ला विधानपरिषद निवडणुक झाल्यावर ते सुरत ला गेले. त्यानंतर २९ जून पर्यंत आसाम राज्यातील गुवाहाटी येथे त्यांचा मुक्काम होता. तिथून ते गोव्यात आले. ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर २ जुलै रोजी आ.गायकवाड शिंदे गटातील आमदारांसोबत मुंबईला आले. दोन दिवस विधानसभेच्या विशेष अधिवशेनाला हजेरी लावल्यानंतर काल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी ते नतमस्तक झाले.

नंतर ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून आ.गायकवाड मतदारसंघाच्या दिशेने रवाना झाले. आज ,५ जुलैच्या सकाळी ते बुलडाणा शहरात दाखल झाले असून ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर पत्रकार परिषद घेणार आहेत. याशिवाय मतदार संघातील कार्यकर्त्यांशी सुद्धा फेसबुक वरून संवाद साधणार आहेत.