BREAKING! बुलडाणा तालुक्यातील "या" 12 ग्रामपंचायतींची 29 ला आरक्षण सोडत!! 1 ऑगस्टपासून हरकती: तहसीलदार रूपेश खंडारे यांची माहिती

 
tashil
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बुलडाणा तालुक्यातील 12 ग्राम पंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणूकासाठी येत्या 29 जुलैला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

तहसीलदार रूपेश खंडारे यांनी बुलडाणा लाइव्ह सोबत बोलताना ही माहिती दिली. यामध्ये चिखला, दत्तपुर, ढालसावंगी , गिरडा, दहिद खुर्द, इरला, रुईखेड मायांबा, सव, सावळा, उमाळा, येळगाव व मोंढाळा या ग्राम पंचायतीचा समावेश आहे. यासाठी आयोजित विशेष सभेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. या सभेत ओबीसी,ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला या प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात येणार असल्याची माहिती खंडारे यांनी दिली.

याची अधिसूचना 26 जुलैला काढण्यात येणार असून 29 ला आयोजित सभेत सोडत काढण्यात येईल. 1 ऑगस्टला याची प्रारूप प्रसिद्धी करण्यात येणार असून 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान हरकती, सूचना सादर करता येणार आहे. यावर एसीओ हरकती लक्षात घेऊन  10 ऑगस्ट पर्यंत अभिप्राय देणार असल्याचे तहसीलदार खंडारे यांनी स्पष्ट केले.