BREKING! आरक्षणामुळे 'कही खुशी कही गम ' चा माहौल!! बुलडाणा तालुक्यातील पंस चे असे आहे आरक्षण..!!
Jul 28, 2022, 13:32 IST
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील 14 पंचायत समिती गणांचे आज 28 जुलैच्या मुहूर्तावर काढण्यात आले. यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात ' कही खुशी, कही गम' असे मजेदार चित्र तयार झाले असून अनेक बाप्यांची संधी हुकली असून त्यांना आता गृहलक्ष्मीला मैदानात उतरावे लागणार आहे.
जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एसडीओ राजेश्वर हांडे, तहसीलदार रूपेश खंडारे, नायब तहसिलदार , नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, निवडणूक कक्षाचे नितीन रिंढे पाटील यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.
आज काढण्यात आलेले गण निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. देऊळघाट- ओबीसी स्त्री, सागवान- सर्वसाधारण, डोंगर खंडाळा ओबीसी, येळगाव-अनू. जमाती महिला, साखळी बुद्रुक- सर्वसाधारण महिला, ढालसावंगी- एससी महिला, दहिद बुद्रुक- सर्वसाधारण महिला, मासरूळ- ओबीसी महिला, सातगाव म्हसला- एससी, धाड- ओपन, चांडोल- ओपन, पिंपळगाव सराई- ओपन, रायपूर एससी महिला.