BREAKING! आरक्षण सोडत तहसील ऐवजी जिल्हा कचेरीत!! बुलडाणा तालुक्यातील ७ जिप मतदारसंघाचे वेधले लक्ष

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येत्या १३ जुलै रोजी बुलडाणा तहसील मध्ये  आयोजित बुलडाणा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाची सोडत आता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. 

बुलडाणा तालुक्यातील रायपूर, धाड, साखळी बुद्रुक, सावळा,  ढालसावंगी, मासरूळ, देऊळघाट या ७ जिल्हापरिषद गटांची व १४ पंचायत समिती गणांची ओबीसी वगळून अन्य प्रवर्गांची आरक्षण सोडत अगोदर बुलडाणा तहसील मध्ये काढण्यात येणार होती. मात्र आता ही सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.  'सध्याची  एकंदर परिस्थिती' लक्षात घेता हा बदल करण्यात आल्याचे तहसीलदार रूपेश खंडारे यांनी सांगितले.