BREAKING!'मातोश्री' च्या बैठकीला खा. जाधव यांची हजेरी!! 'वेट अँड वॉच' ची भूमिका कायम

 
jadhav
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा शिवसेना ,  जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळासह सामान्य जिल्हा वासीयांचे लक्ष ज्यांच्यावर खिळलेल्या आहेत ते खासदार प्रतापराव जाधव तूर्तास  तरी 'शांत' राहणार असे चित्र आहे! याचे कारण आज मातोश्री ला आयोजित महत्वपूर्ण बैठकीला बुलडाण्याच्या खासदारांनी हजेरी लावली. 

यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ११ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मातोश्री ला बैठक बोलाविली होती. वरकरणी १८ पासून सुरू होणारे  संसदचे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर औपचारिक बैठक असे सांगण्यात आले. मात्र आमदार पाठोपाठ खासदारांची संभाव्य गळती व बंडखोरी रोखणे, खासदार मंडळींची नाराजी दूर करणे हे यामागील हेतू होते. शिवसेनेसाठी महत्वाच्या असलेल्या या बैठकीची उत्सुकता लाखो जिल्हा वासीयांना देखील होती.  कारण एकच, भाऊ नावाने लोकप्रिय खा. प्रतापराव जाधव यावेळी  हजर राहतात की ' नॉट रीचेबल' राहून  दांडी मारतात काय? ही उत्सुकता त्यांना होती.

या बैठकीला  खा . जाधव यांनी हजर राहून तूर्तास तरी त्यांना घाई नसल्याचे स्पष्ट केल्याचे मानले जात आहे. रविवारी आषाढी निमित्त पंढरपूर मध्ये वारकरी बनून आलेले आणि संभाव्य गाठी भेटीच्या शक्यतेने चर्चेत आलेले खासदार  जाधव यांनी बैठकीला हजेरी लावून या चर्चेला तूर्तास विराम दिला. मात्र बुलडाण्याचे प्रभारी आणि आषाढीला हजर असलेले खा. संजय जाधव( परभणी) हे मात्र यावेळी गैरहजर होते. खा.भावना गवळी, रामटेकचे कृपाल तुमाणे, हे अपेक्षेप्रमाणे हजर नव्हते. या घडामोडीमुळे खा. जाधव यांची भूमिका सध्या तरी गुलदस्यात राहिली आहे.