भाजपा लागली लोकसभेच्या तयारीला! प्रभारी ना. रावसाहेब दानवे उद्या बुलडाण्यात
लोकसभा वा विधानसभा निवडणुकांचे दीर्घकालीन नियोजन करण्यावर भाजपचा भर राहिला आहे. २०१४ पासून पक्षाच्या दणदणीत विजयाचे ते मुख्य कारण राहिले आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीला अजून २ वर्षांचा अवधी शिल्लक असला तरी, भाजपा आत्तापासून कामाला लागलीय! पक्षाने त्यादृष्टीने नुकतेच प्रमुख नेत्यांवर लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी सोपविली आहे. बुलडाणा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर ना. दानवे यांचा १३ एप्रिल चा दौरा महत्वाचा मानला जात आहे. भोकरदन येथून ते सकाळी बुलडाणा येथे दाखल होणार आहे. सकाळी ११ वाजता राजेंद्र गोडे नर्सिंग कॉलेज मध्ये आयोजित या बैठकीत ते भाजपाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी समवेत चर्चा व खलबते करणार आहे. यावेळी संघटनात्मक बाबी, पक्षाची तयारी, संभाव्य लढत, इच्छुक उमेदवार, आदी विषयांवर चर्चा व मार्गदर्शन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ना. दानवे दुपारी ३ वाजता भोकरदन कडे रवाना होणार असल्याने ही बैठक किमान दोन ते अडीच तास चालण्याची शक्यता आहे.