BIRTHDAY SPECIAL बिनविरोध सरपंच अन् थेट लोकवर्गणीतून आमदार! आजच्या राजकारणात अशक्य वाटतय ना..? पण ते करून दाखवलंय तोताराम कायंदे साहेबांनी! वाचा कनवाळू लोकनेत्याची प्रेरणादायी गोष्ट

 
totaram
बुलडाणा( बाळासाहेब भोसले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकवेळेला आमदार ,खासदार बिनविरोध होईल पण सरपंच कुठ बिनविरोध होत असतो का असं कुणीही म्हणेल..पण ज्या व्यक्तीजवळ  विकासाच्या प्रगल्भ संकल्पना आहेत..समाजाच्या उन्नतीची धडपड आहे, उमेदीने आणि रस्त्यावर उतरून काम करण्याची तयारी आहे अशा व्यक्तीसाठी गावकरी एकत्र येतात अन् ऐन तिशीत असलेल्या युवकाच्या खांद्यांवर गावाच्या विकासाची जबाबदारी सोपवतात..हे सगळ पाहिलंय सिंदखेडराजा तालुक्यातल्या रुम्हणा या गावानं.. साल होत १९८२..आणि त्या तरुण लोकप्रिय सरपंचांच नाव होत तोताराम तुकाराम कायंदे..! त्यानंतर अवघ्या तीनच वर्षात पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही किंवा कुठली सोसायटीची निवडणूक नाही तर लोकांच्या आग्रहाखातर या माणसानं थेट १९८५ ची विधानसभेची निवडणूक लढवली अन् पहिल्याच प्रयत्नात ती जिंकलीदेखील. आता तोताराम कायंदे आमदार तोताराम कायंदे साहेब झाले होते. सामान्य शेतकऱ्याचा लेक महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात पोहचला होता. मात्र साहेबी थाटात ते कधी वावरलेच नाहीत, लोकांना ते कायम आपलेच वाटतात ते त्यामुळेच..!!

totaram

तोताराम कायंदे उर्फ मामा यांचा आज, २० सप्टेंबरला ७७ वा वाढदिवस. या वयातही तरुणांना लाजवेल एवढा उत्साह, काम करण्याची प्रचंड ऊर्जा येते कुठून ? असा प्रश्न अनेकांना पडतो. अर्थात सरपंच झाले तेव्हापासूनच आपल्या लोकांसाठी जगण्याचा संकल्प करणाऱ्या या लोकनेत्याच्या डिक्शनरीतून विश्रांती हा शब्दच तेव्हापासून गायब झालाय.

वडिलांकडून मिळालेला हा जनसेवेचा वारसा त्यांचे पुत्र डॉ.सुनील कायंदे समर्थपणे सांभाळत आहे.  १९९५ नंतर कायंदे साहेबांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही मात्र त्यानंतरही लोकांशी त्यांची जुळलेली नाळ आजही तेवढीच घट्ट आहे. आजही सकाळी ७ वाजेपासून साहेब लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध असतात. लोकप्रतिनिधी नसतांना सुद्धा आपले मायाळू, कनवाळू साहेब आपले काम मार्गी लावणारच हा विश्वास लोकांना त्यांच्याबद्दल वाटतो. लोकांच्या दुःखात, सुखात ते आवर्जून सहभागी असतात. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल कायमच आदर आहे. 

gj
   
आंदोलक साहेब...
 
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साहेब अनेकदा रस्त्यावर उतरलेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलने केली. जिजामाता ऊस उत्पादक संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढत असताना साहेबांना जेल मध्ये सुद्धा जावे लागले मात्र तरीही ते मागे हटले नाहीत.

सिंदखेडाजा विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंझावात...!

आमदार झाल्यानंतर साहेबांनी गावोगावच्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले. अत्यावश्यक कामे, लोकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारतींची कामे  कायंदे साहेबांच्या कार्यकाळात झाली. सिंदखेडाजा येथील बसस्थानकाचे बांधकाम आणि शरद पवारांच्या हस्ते झालेले उद्घाटनही साहेबांच्या कार्यकाळातच. तत्कालीन ऊर्जामंत्री सुधाकरराव नाईक यांच्याकडे पाठपुरावा करून मतदारसंघात अनेक उपकेंद्रांना त्यांनी मान्यता मिळवून दिली. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सिंचनाचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री भारत बोंद्रे   यांच्या सहकार्याने खडकपूर्णा प्रकल्प साहेबांनी मंजूर करून घेतला. धानोरा, सावंगी वीर एक व दोन हे प्रकल्पही साहेबांनी जातीने लक्ष घालून पूर्ण करून घेतले.
  
शिक्षणमहर्षी ...!

मतदासंघातील त्यावेळी असलेल्या अपुऱ्या शिक्षणाच्या सोयींनी साहेबांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांचे जाळे भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी उभे केली. आणि ग्रामीण भागातील खेडोपाडी शिक्षणाच्या चांगल्या सुविधा निर्माण केल्या.