BIG BREKING स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला चिखलीच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा ताबा! विनायक सरनाईक,नितिन राजपुत यांचा शेतक-यांच्या मागण्यांसाठी आक्रमक पावित्रा...
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतक-यांनी अग्रीकल्चर इन्सुरन्स विमा कंपनीच्या (AIC)माध्यमातुन शेतीपीकाचा विमा काढला होता.विमा मंजुर झाला
परंतु अनेकांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा झाली असल्याने विमा कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात व शेतकरी हिताच्या विविध मागण्या घेऊन स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांच्यासह शेतक-यांनी आक्रमक पावित्रा घेत कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. मागण्यांचा निपटारा करा अन्यथा कृषी कार्यालय सोडणार नसल्याची भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह इतर पिकांचे अतिवृष्टि व सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेकांच्या उभ्या पिकाला कोंब फुटले तर नदीकाठच्या शेतीपीकाचे सुद्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.असे असतांना रविकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने बैठक बोलत राज्यासाठी पिक विमा मंजुर करण्यात आला.त्याचप्रमाणे पहिल्या टप्यात अतिवृष्टि ची नुकसान भरपाई रक्कम देखील मंजुर केली आहे.परंतु विमा कंपनीकडुन पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली परंतु ती प्राप्त रक्कम विमा कंपनीने मनमानी पध्दतीने व नियमानुसार टाकली नाही.तर काहिंना बऱ्यापैकी तर अनेकांच्या खात्यावर तुटपुंजीच म्हणजे प्रिमीयम पेक्षा सुद्धा कमी रक्कम मिळाली आहे.
त्याचप्रमाणे हजारो शेतकरी वंचीत राहले असल्याने त्यांनी कृषी विभागाकडे विमा कंपनी विरोधात लेखी स्वरुपात तक्रारी सादर केलेल्या आहेत. विमा तक्रारींचे निरसन करण्यासाठी राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय,तालुका स्तरीय समिती असते परंतु तालुक्यात हजारो तर जिल्ह्यात लाखो तक्रारी प्राप्त असतांना देखील समितीने कुठलीच बैठक आजपर्यत घेतली नसल्याने प्रशासन शेतकरी प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे सरनाईक यांनी केला होता.वंचीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करण्यात यावी,तुटपुंजी रक्कम प्राप्त शेतक-यांना उर्वरीत विमा रक्कम अदा करण्यात यावी,तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तक्रार निवारण समिती बैठकीत आढावा घेऊन राज्यस्तरीय समितीला व शासनास अहवाल सादर करण्यात यावा,कमी पैसे रक्कम जमा झाल्याने याबाबतचा तफावत अहवाल बनवुन शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम अदा करावी,कंपनीने नियम दाब्यावर ठेवत केलेल्या मनमानी कारभाराची कुठलाही ताळमेळ नसल्याची चौकशी करुण दोषींवर कारवाई करण्यात यावी,यासह आदि मागण्यांचे सविस्तर निवेदन तहसिलदार,तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले होते.
त्याचप्रमाणे विमा न काढलेल्या अतिवृष्टिग्रस्त शेतक-यांची मंजुर रक्कम मंजुर असुन ती शासनाने ऐनवेळी लादलेल्या ऑनलाइन कार्यपध्दतीमुळे रखडली असुन यामुळे अनेक शेतकरी वंचीत राहणार असल्याने ति नुकसानीची रक्कम तलाठ्यांकडे याद्या तयार असल्याने पुर्वीच्या नैसर्गीक आपत्ती विभागातुन चेकव्दारे देण्यात यावी,अशी मागणी देखील करण्यात आली होती.परंतु मागण्यांची दखल आठ दिवसांचा कालावधी उलटुन देखील कारवाई होत नसल्याने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत येत असलेल्या विविध मागण्यांसाठी विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांनी कृषी कार्यालयाचा ताबा घेतला असुन असंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.तर न्याय मिळे पर्यत कार्यालय सोडणार नसल्याची भुमिका आंदोलनकर्ते यांनी घेतली आहे.