BIG BREKING भारत जोडो यात्रा शेगाववरून पुढच्या प्रवासाला रवाना! आज गौलखेड - जलंब मार्गावर; भास्तन येथे होणार कॉर्नर सभा; भेंडवड मध्ये मुक्काम! बुलडाणा लाइव्ह वर "भारत जोडो" यात्रा लाइव्ह...
शेगाव ( कृष्णा सपकाळ; बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल, १८ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात आहे. काल, शेगाव येथील जाहीर सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले. रात्री शेगाव शहरातील गजानन दादा पाटील यार्ड मार्केट मध्ये त्यांनी मुक्काम केला. दरम्यान आज, १९ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजेपासून ही यात्रा पुढील मार्गासाठी मार्गस्थ झाली आहे. ही यात्रा आज गौलखेड जलंब मार्गावर चालणार आहे. शेगाव तालुक्यातील भास्तन येथे दुपारी कॉर्नर सभा होणार आहे तर यात्रेचा आज ,जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड येथे मुक्काम राहणार आहे. उद्या २० नोव्हेंबरला जळगाव जामोद शहरातून सातपुडा कॅम्प येथे दुपारच्या विश्रांतीनंतर निमखेडी मार्गे मध्यप्रदेशात दाखल होणार आहे. भारत जोडो यात्रेचे लाइव्ह प्रक्षेपण बुलडाणा लाइव्ह वर पाहता येणार आहे..
पहा लाइव्ह..👇