BIG BREAKING मुख्यमंत्र्यासोबत ऑफलाईन दिसले; खा.जाधवांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब झाहले! बुलडाणा लाइव्ह चे '२४ तासात फैसला ' वृत्त ठरले अचूक!!आज पीएम सह अध्यक्षांना भेटणार

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी;बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  काल सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'ऑन लाईन '  भेटणारे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी  आज दिल्ली मध्ये त्यांची ऑफ लाईन अर्थात थेट भेट घेतली! यामुळे खासदारांच्या बंड खोरीवर आणि अर्थातच ते शिंदे गटात शामिल झाल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं!! यामुळे गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडीवर बारकाईने नजर ठेवून असणाऱ्या 'बुलडाणा लाईव्ह' ने काल सर्व प्रथम दिलेले खा. जाधवांचा फैसला २४ तासात' हे वृत्त तंतोतंत अचूक ठरले.

वरकरणी संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार मात्र  प्रत्यक्षात सेना खासदारांच्या बंडा संदर्भात दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या स्वागताला खा. प्रतापराव जाधव अग्रभागी असल्याचे दिसून आले. या ऑफलाइन भेटीची छायाचित्रे बुलडाणा लाइव्ह च्या हाती आली असून त्यात  कैक दिवस तळ्यात मळ्यात असणारे खा.जाधव अग्रभागी असून मुख्यमंत्र्यांच्या बाजूला खा. भावना गवळी आहेत. दरम्यान दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री १२ खासदारासह लोकसभा अध्यक्षांना भेटले आहे.

यानंतर ते पीएम नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.  तसेच बंडखोरांना केंद्रीय मंत्रिमंडळात २ पदे मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. यामध्ये खासदार जाधव यांना संधी मिळते का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रतापगड सुरक्षित व नियंत्रणाखाली असला तरी खासदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.