BIG BREKING प्रतिष्ठेच्या सुंदरखेड ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर; अपर्णा राजेश चव्हाण झाल्या सरपंच! प्रतिक जाधव ,संतोष राजपूत पराभूत

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वात कमी मतदान आणि डझनभर सरपंच पदाचे उमेदवार असल्याने चर्चेत असलेल्या सुंदरखेड ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. सौ. अर्पणा राजेश चव्हाण , जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप जाधव यांचे पुत्र प्रतीक जाधव आणि संतोष राजपूत यांच्यात प्रामुख्याने लढत झाल्याचे दिसून आले. या लढतीत अखेर अपर्णा राजेश चव्हाण यांनी बाजी मारत विजय संपादन केला. 

अवघे ५४ टक्के मतदान झाल्याने सुंदरखेड ग्रामपंचायत चर्चेत आली होती. सर्वच उमेदवार जोर लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. बुलडाणा शहराला लागून असल्याने निवडणूक  प्रतिष्ठेची होती . अखेर या प्रतिष्ठेच्या लढतीत अपर्णा राजेश चव्हाण यांनी बाजी मारली आहे.