BIG BREAKING २४ तासांच्या आत खासदार प्रतापराव जाधवांचा फैसला?; "त्या" यादीत खा. जाधवांचेही नाव.!! आ. रायमुलकरांच्या पोस्टवर पुन्हा एकदा खासदारांची एन्ट्री..!!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज ,उद्या, परवा असे म्हणता म्हणता जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक ज्या क्षणाची अन् ज्या घोषणेची वाट पाहत होते तो क्षण आता लवकरच येण्याची शक्यता आहे.. प्रतापगडाचे दोन महत्वाचे शिलेदार शिंदेसेनेत गेल्यानंतर आता स्वतः खा. जाधव हेसुद्धा लवकरच शिंदेसेनेत  सामील होणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे ते एकटे जाणार नसून राज्यातील १४ खासदारांची मोठी फौज शिंदे सेनेत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे . त्या १४ खासदारांची यादी तयार झाली असून लोकसभेतील प्रतोदपदी खा. भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. आज, १८ जुलै रोजी तसे पत्र हे बंडखोर खा. लोकसभा अध्यक्षांना देण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व खासदर सध्या दिल्लीत आहे. या  दिल्लीवारीत  ही घोषणा होण्याची शक्यता आहे. पक्षांतरबंदी कायदा, अपात्रता या कचाट्यात सापडू नये म्हणून ही मोहीम अतिशय पद्धतशीरपणे आखण्यात येत होती. कोल्हापूरचे खा. संजय मंडलिक यांचे  शिंदेसेनेत जाण्याचे पक्के झाल्यानंतर आता आवश्यक संख्याबळाचा आकडा बंडखोर खासदारांच्या टोळीकडे आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांत १४ खासदार शिंदेसेनेत अधिकृत दाखल होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. या यादीत खा. प्रतापराव जाधव यांचेही नाव असल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर या निर्णयाचे मोठे परिणाम होणार आहेत.
   
मंत्रीमंडळाचा निर्णय अन् त्यावर खा. जाधवांचा फोटो.. !
  
आ. संजय गायकवाड आणि आ. रायमुलकर दोघेही खा.जाधवांना आपला राजकीय गुरू मानतात. गुरू आपले पत्ते वेळेवर उघडतील असे विधान काही दिवसांआधी आ. गायकवाडांनी केले होते. आ. रायमुलकर यांनीसुद्धा  अप्रत्यक्षपणे खा. जाधव आमच्यासोबत असल्याचे अनेकदा सांगितले होते. खा.जाधव यांनी मात्र अजूनतरी अधिकृत भूमिका स्पष्ट केली नव्हती..मात्र लोकसभेची जागा शाबूत ठेवायची असेल तर  खासदार शिंदेसेनेत जातीलच असा कयास अनेक राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात होता.

त्यातच गेल्या चार पाच दिवसांपासून आ.संजय रायमुलकर यांच्या फेसबुक वॉल वर करण्यात येणाऱ्या पोस्टवर पुन्हा एकदा खा. जाधव यांची एन्ट्री झाली आहे .  विशेष म्हणजे मधल्या काही दिवसांत खा. जाधव हे दोन्ही आमदारांच्या पोस्टवरून गायब झाले होते. आ. रायमुलकरांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देणाऱ्या पोस्टवर खा. जाधव यांचा फोटो टाकल्याने आता जवळपास १०१ टक्के सगळ ठरल्याची चर्चा आहे. आता फक्त "त्या" घोषणेची प्रतीक्षा...!!