BIG BREAKING मुख्यमंत्री शिंदेच्या बैठकीला खा. जाधवांची ऑनलाईन हजेरी?!; जवळपास सगळच फायनल..!!
मुंबईत हॉटेल ट्रायडेंट मध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली. याच बैठकीत हे १४ खासदार उपस्थित होते. ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, गजानन किर्तीकर, अरविंद सावंत वगळता उरलेले खासदार या बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत खा. राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी तर प्रतोद म्हणून खा. भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आली.
विशेष म्हणजे याबाबतचे वृत्त बुलडाणा लाइव्ह ने आज दुपारीच प्रकाशित केले होते हे विशेष..! बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी आतापर्यंत वेट अँड वाच ची भूमिका घेतलेली होती. उद्धव साहेबांनी हिंदुत्ववादी पक्षासोबत जावे असे याआधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते. मात्र त्यांची नेमकी भूमिका त्यांनी जाहीर केली नव्हती. आता मात्र दिल्लीवारीतच त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. उद्या १९ जुलै रोजी संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सगळे चित्र समोर येणार आहे..!