BIG BREAKING मुख्यमंत्र्यांनी रविकांत तुपकरांना चर्चेला बोलावले! दुपारी अडीचला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार बैठक; तुपकर म्हणाले, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकरी मुंबई सोडणार नाहीत!

 अपेक्षित निर्णय आला नाही तर जलसमाधी घेणारच..

 
jyhf
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आज,२४ नोव्हेंबरला सकाळी मुंबईच्या वेशीवर दाखल झाले आहेत. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी जलसमाधी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांच्यासह हजारो शेतकरी आज,मुंबईत दाखल झालेत. दरम्यान थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविकांत तुपकर यांच्याशी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक लावण्यात आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुध्दा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान रविकांत तुपकर त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अपेक्षित निर्णय आला नाही तर आपण हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेणारच असे रविकांत तुपकरांनी म्हटले आहे. दुपारी अडीचला होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण तुपकरांनी स्वीकारले असले तरी तुपकर जोपर्यंत बैठक आटोपून परत येत नाहीत व पुढील घोषणा करीत नाहीत तोपर्यंत हजारो शेतकरी मुंबईतच थांबणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत अपेक्षित निर्णय आला नाही तर आपण जलसमाधी घेणारच अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा तुपकरांशी फोनवरून चर्चा केली आहे.