BIG BREAKING अंचरवाडी जिल्हा परिषद सर्कल ओबीसी सर्वसाधारण साठी राखीव!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदा नव्याने नामकरण झालेल्या अंचरवाडी जिल्हा परिषद सर्कल कडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. आज, २८ जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या आरक्षण सोडतीनंतर अंचरवाडी जिल्हा परिषद सर्कल नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी सर्वसाधारण साठी आरक्षित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंचरवाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये येणाऱ्या निवडणुकीत २२ हजार ५०० मतदार मतदान करण्यासाठी पात्र ठरले आहेत. या सर्कलमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी ,भावी उमेदवारांनी आधीपासून तयारीला सुरुवात केली होती. दरम्यान आज झालेल्या सोडतीत अंचरवाडी जिल्हा परिषद सर्कल ओबीसी सर्वसाधारण   या प्रवर्गासाठी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या आरक्षण सोडतीवेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती, उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे उपस्थित होते.