BIG BREAKING! 'उध्दवराजेंचा' थेट मुख्यमंत्री शिंदेंना कॉल! ऑडियो क्लिप व्हायरल.....!!

 
shinde
 बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शिवसेनेतील महाबंडाळी नंतर  बंडखोर आमदार आणि कट्टर शिवसैनिक, पदाधिकारी यांचे ' प्रेमळ संवाद रंगले, व्हायरल झाले!  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, काहींना अडचणीत तात्काळ मदत करताना काही व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यात... त्यामुळे ते सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत अशी भावना शेतकरी वर्गात देखील जागृत झाली, आणि त्यामुळेच वन्य प्राण्यांनी त्रस्त झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला, आणि आपले गाऱ्हाणे मांडले, त्यांची ही कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे... 

बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातील वाकी बुद्रुक,  बायगाव , मेंडगाव,  पिप्रीआंधळे , अंढेरा, सेवानगर,  धोत्रा नंदई,  वाकी खुर्द , डोद्रा , अंचरवाडी या गावाजवळ वनविभागाचे जंगल असून यामध्ये नीलगाय हे शेतातील पीक पूर्णपणे नष्ट करत असून, शेतकरी वारंवार वन विभागाकडे तक्रारी करत आहेत, मात्र या वन्य प्राण्यांचा कुठलाही बंदोबस्त होत नसल्याने अखेर त्रस्त झालेल्या वाकी बुद्रुक येथील शेतकरी उद्धवराजे नागरे यांनी काल रात्री ८ वाजता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आपल्या शेतातून पिकांचे वन्य प्राण्यापासून रक्षण करत असतानाच फोन केला..

आणि आपले गाऱ्हाणे मांडले... यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपल्या सोबतच्या अधिकाऱ्याला फोन देऊन माहिती घेण्यास सांगितले, तेव्हा त्या अधिकाऱ्याने ही या  शेतकऱ्यांस तुमच्या जिल्यातील वन अधिकाऱ्यांना , जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करायल सांगतो,  तुमचं नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी संबंधितांना बोलतो, असे बोलून कारवाई चे आश्वासन दिलय.. 

  सध्या या दोघांची ऑडियो क्लिप व्हायरल होत असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रती भावनिक वातावरण निर्माण होत असतांनाच दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करत आहेत एवढं मात्र निश्चित...