BIG BREAKING! देऊळगाव राजा पालिकेची निवडणूक स्थगित!!

 
parished

 बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी)  राज्य निवडणूक आयोगाने  राज्यातील 92 नगरपरिषद निवडणूक स्थगित केल्या आहे. यामध्ये जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिषदेचा समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी आज संध्याकाळी यासंदर्भातील आदेश जारी केले.  सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने बाठिया अयोगाचा अहवाल सादर केल्यावर 11 ला विशेष अनुमती याचिकेवर सुनावणी झाली असून त्यावर 19 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहे.  पावसाच्या अंदाजावर आधारित या निवडणुक कार्यक्रमात 22 पासून उमेदवारी  अर्ज भरण्यात  येणार होते. मात्र यामुळे निर्माण झालेल्या शासकीय व प्रशासकीय संभ्रमावर बुलडाणा लाईव्ह ने आजच्या वृत्तात प्रकाश टाकला होता हे विशेष.