गर्दी जमवण्यासाठी सगळी फेकाफेकी; भारत जोडो यात्रेच्या शेगावच्या सभेत उद्धव ठाकरे , शरद पवार येणार असल्याची अफवाच! मात्र दोघेही येणार नाहीत..

 
jhggh
शेगाव( ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): इतर जिल्ह्यात अतिशय प्रभावी राहिलेली भारत जोडो यात्रा बुलडाणा जिल्ह्यात नियोजनाच्या अभावी फ्लॉप होण्याची चिन्हे आहेत. सभास्थळी ५ लाख लोक जमणार असल्याचा दावाच मुळात प्रचंड खोटा असल्याचे सभास्थळी लावलेल्या खुर्च्यांच्या संख्येवरून दिसते. दरम्यान गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी आता नवीन शक्कल लढवली असून शेगावात होणाऱ्या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित राहणार असल्याचा बातम्या पेरल्या जात आहेत. काही प्रसारमाध्यमांनी तशा बातम्या सुद्धा काँग्रेस नेत्यांच्या हवाल्याने दिल्या आहेत. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे शेगावात येणार नसल्याचे "बुलडाणा लाइव्ह" च्या तपासणीत समोर आले आहे.

भारत जोडो यात्रेला इतर जिल्ह्यात, राज्यात उदंड प्रतिसाद मिळाला. राहुल गांधींच्या पदयात्रेत लोक उस्फुर्तपणे सहभागी झाले. मात्र बुलडाणा जिल्ह्यात नेत्यांची अंतर्गत गटबाजी,समन्वयाचा अभाव, एकमेकांवरील अविश्वास यामुळे यात्रेचा पचका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गर्दी जमवण्यासाठी अक्षरशः भाड्याने माणसे आणण्यात येत आहे. गाडी भाड्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली असून तुम्ही फक्त गाड्या आणा असे फर्मान सोडण्यात आले आहे.  

दरम्यान काँग्रेसच्या काही नेत्यांनी तर या सभेला शरद पवार ,उद्धव ठाकरे येणार असल्याचे सांगितले. तशा बातम्या पेरण्यात आल्या. विविध व्हाट्सअप ग्रुप वर तसेच मॅसेज फिरवण्यात आले.मात्र ही सगळी फेकाफेकी असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसैनिकांची गर्दी जमवण्यासाठी ही सगळी फेकाफेकी सुरू  असल्याचे कळते.