घाटाखालील सर्व पदाधिकारी शिंदे गटात : जिल्हा प्रमुख शांताराम दाणे! खा. जाधव यांच्या नेतृत्वाखाली राहणार!

 
trhtj
शेगांव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
 खा.प्रतापराव जाधव यशिंदे गटात गेल्याने त्यांचे नेतृत्वात घाट खालील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांनी स्थानिक विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले. पुढे बोलताना ते म्हणाले की खा. जाधव यांनी शिवसेनेतील प्रत्येक व्यक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्या मुळे जळगाव जामोद, खामगाव, मलकापूर विधानसभा मतदार संघातील बहुतांश पदाधिकारी खा. प्रतापराव जाधव यांचे नेतृत्वात मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख शांताराम दाणे,राजू मिरगे उपजिल्हा प्रमुख,संजय अवताडे उपजिल्हा प्रमुख,संतोष लिप्ते,उमेश अवचार,उमेश पाटील,संतोष डीवरे तालुका प्रमुख नांदुरा,विजय साठे तालुकाप्रमुख मलकापूर,रामेश्वर थारकर तालुका प्रमुख शेगांव, रवी इटखेडे उपतालुकप्रमुख नांदुरा,सुभाष गवळी नांदुरा,राजू काटे नांदुरा,सुनील जुणारे नांदुरा,गजानन करंगले नांदुरा,संतोष लहुडकर नांदुरा,एकनाथ वक्ते नांदुरा,मनोज वक्ते, नंदकिशोर खोदले,विशाल हेलगे, सौ शैलेंजताई ठाकरे, महिला आघाडी शेगांव,संतोष घटोळ शहर प्रमुख शेगांव,आशिष गणगणे नगरसेवक शेगांव,शैलेश दाबेराव नगरसेवक शेगांव,बाबूभाऊ भट्टड खामगाव,देविका पटेल महिला आघाडी शेगांव यांची उपस्थिती होती.