अखेर पचका झालाच..!शेगावात पाच लाख लोकांची गर्दी जमणार असल्याचा दावा फोल; राहुल गांधीं भाषणाला उभे राहिले तेव्हाचा रिकाम्या खुर्च्यांचा हा व्हिडिओ पहा; सगळ ध्यान्यात येईल!

 
शेगाव ( ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. राहुल गांधींच्या शेगाव येथील सभेला ५ लाख लोक गर्दी करणार असल्याचा आयोजकांचा दावा अखेर सपशेल फोल ठरला. राहुल गांधींचे भाषण सुरू असताना मैदानातील अनेक खुर्च्या या रिकाम्या असल्याचे "बुलडाणा लाइव्ह" च्या तपासणीत समोर आले.( बातमीच्या खाली आपल्याला तो व्हिडिओ पाहता येईल)

काल,रात्रीपर्यंत मैदानात ४८ हजार खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. आज सभा सुरू होईपर्यंत त्यात जवळपास २० हजार खुर्च्यांची वाढ करण्यात आली होती. फार फार तर ७० हजार खुर्च्या पकडल्या तरी त्यातील बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शेगावात भारत जोडो यात्रेचा पचका झाल्याचे स्पष्ट झाले.  असे असले तरी अनेक जण स्वयंस्फूर्तीने खा. राहुल गांधींना ऐकायला आली होती. इतर जिल्ह्यात व इतर राज्यात या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला,मात्र जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत गटबाजीमुळे जिल्ह्यात यात्रेच्या उपस्थितीवर परिणाम झाल्याचे दिसून आले..अर्थात ५ लाखांचा आकडा हा फुगाच होता, एवढा आकडा जाहीर करायची अती घाई नेत्यांनी केली आणि त्यामुळेच झाला तो पचका.

 पहा व्हिडिओ 👇