मेहकरात उद्या आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठा यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे शहर प्रमुख किशोर गारोळेंचे आवाहन; म्हणाले, उद्या दाखवून देऊ..

 
मेहकर( अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे फायरब्रँड नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची तोफ उद्या मेहकरात धडाडणार आहे.खासदार प्रतापराव जाधव यांचे होमग्राउंड असलेल्या मेहकरात ही निष्ठा यात्रा येणार असल्याने साऱ्या जिल्ह्याचे याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान निष्ठा काय असते हे उद्या दाखवून देऊ, तालुका व जिल्ह्यातून प्रचंड संख्येने निष्ठावान शिवसैनिक उद्या मेहकरात येणार असल्याचे शहर प्रमुख किशोर गारोळे यांनी सांगितले.

   thhh

                   [  जाहिरात👆]

मेहकर शहरातील नगर परिषद समोर आदित्य ठाकरे यांची ठीक १२ वाजता ही सभा होणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही शिवसेनेचे युवा नेते तथा मेहकर शहर प्रमुख किशोर गारोळे यांनी केले आहे. खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर ह्या दोन्ही नेत्यांनी उठाव केल्यानंतरही मेहकर शहर व परिसरात किशोर गारोळे यांनी शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मजबूत संघटन निर्माण केले आहे.

अनेक निष्ठावान तरुणांची मोठी फौज किशोर  गारोळे यांनी उभी केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्या बुलडाणा येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शिवसैनिक संतप्त आहेत. दरम्यान या मुद्द्यावर उद्या आदित्य ठाकरे आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी कडेकोट बंदोबस्त लावण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदारांना दिल्या आहेत.