राजीनामा मागणाऱ्या आदित्य ठाकरेंना खा. जाधवांचे प्रत्युतर! म्हणाले,तुम्ही राजीनामा द्या,आम्ही लोकभावनेचा आदर केला, तुम्ही बेईमानी ! आदित्य ठाकरे "नाईटबार" संस्कृतीवाला मुलगा,

काळ्या मातीचा चिखल त्यांच्या पायाला लागला नाही! खरा मनस्ताप तर "यांचाच" होता म्हणाले..

 
jadhav
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आदित्य ठाकरे आणि खा. अरविंद सावंत यांनी मेहकरच्या सभेत खासदार प्रतापराव जाधवांवर टीका केली होती. १२ खासदार आणि ४० आमदारांनी राजीनामा द्यावा असे  चॅलेंज आदित्य ठाकरेंनी दिले होते. दरम्यान खा. प्रतापराव जाधव यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आम्ही भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडून आलो होतो, आम्ही लोकभावनेचा आदर केला. तुम्ही महाविकास आघडीसोबत जाऊन लोकभावनेशी बेईमानी केली. तुम्ही राजीनामा द्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडून येऊन दाखवा नंतर आम्हाला राजीनामा द्यायला सांगा असे प्रत्युतर खा. प्रतापराव जाधवांनी दिले आहे. "बुलडाणा लाइव्ह" शी संवाद साधतांना त्यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरेंना शेतीतल काही कळत नाही. काळ्या मातीचा चिखल कधी त्यांच्या पायाला लागला नाही आणि भविष्यात लागेल का याची काही खात्री नाही. शेतीतल काही कळत नाही मग शेतकऱ्यांच्या बांधावर फक्त इव्हेंट करायला, फोटोसेशन करायला गेले होते का ? असा सवालही खा. प्रतापराव जाधवांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे दुःख आमच्यासारखे शेतकऱ्यांची मुले जाणू शकतात. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे असे खा. जाधव म्हणाले. मुंबिईतील हॉटेल , पब, नाईट क्लब रात्रभर चालू ठेवावेत अशी आदित्य ठाकरेंची इच्छा आहे. या संस्कृतीतला मुलगा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन शिवाय दुसरं काही करू शकत नाही असेही खा. जाधव म्हणाले..
   
खा. अरविंद सावंतांना टोला..

 अरविंद सावंत हा "मातोश्री" ची हाजी हाजी करणाऱ्यांपैकी एक आहे. मतदार संघात आणि पक्षात त्यांचं काय कर्तुत्व आहे ते मला माहित आहे. त्यांच्याइतकेच मी शिवसेनेत सिनियर आहे, मी ३७ वर्षांपासून शिवसेनेत काम करतो. सावंतांनी मोतोश्रीवर हाजी हाजी करून पद मिळवली. अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब, संजय राऊत, विनायक राऊत या लोकांचाच खरा मनस्ताप शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना होता. या लोकांच्या मनस्तापामुळेच शिवसेना फुटली.४० आमदार आणि १२ खासदारांना वेगळा निर्णय घ्यावा लागला असे खा. जाधव म्हणाले.