अब्दुल गद्दार आता नौटंकी कशाला करता? बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहानेंचा सवाल; लाज वाटू द्या म्हणाले...

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या प्रक्षोभक विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सतांपाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी अब्दुल सत्तारांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान आज, ८ नोव्हेंबरला कृषिमंत्री अब्दुल सत्तार बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार सिंदखेडराजा येथील मासाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळी जाणार आहेत, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी सत्तार यांच्यावर तोफ डागली आहे.

      bbbb

                  ( जाहिरात👆🏻 )

 एका महिला नेत्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरतांना लाज वाटली पाहिजे. राज्याचे नेते ,कृषिमंत्री म्हणवून घ्यायचा अब्दुल गद्दारांना अधिकार नाही. जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर तात्काळ राजीनामा द्या आणि नौटंकी बंद करा. एकीकडे महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरायची आणि दुसऱ्या दिवशी सिंदखेडराजात येऊन नतमस्तक व्हायचे ही त्यांची नौटंकी आहे. मासाहेब जिजाऊंच्या विचारांवर चालला असता तर अब्दुल गद्दारांच्या तोंडून असे शब्द निघालेच नसते असा घणाघात तालुकाध्यक्ष लहाने यांनी केला आहे.