३१ डिसेंबरला आ.अमोल मिटकरी देऊळघाट मध्ये; महापुरुषांच्या सन्मानार्थ निघालेल्या सन्मान यात्रेच्या समारोप सभेला करणार संबोधित; प्रचंड गर्दी उसळणार

 
itug
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रभावी वक्तृत्वशैलीने सभा गाजविणारे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी देऊळघाट येथे दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा तालुका अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून  महापुरुषांच्या सन्मानार्थ निघालेल्या  'सन्मान यात्रेचा' समारोप ३१ डिसेंबरला आ.अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊळघाट येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळणार असून राष्ट्रप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 भाजपाच्या वाचाळवीरांनी थोर महापुरुषांचा शाब्दिक अवमान केला. मात्र महापुरुषांच्या कार्यकर्तुत्वाचा जागर व्हावा या दृष्टीने यात्रेचे संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून 'सन्मान यात्रा' बुलडाणा तालुक्यात यशस्वीपणे काढण्यात आली.माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या मार्गदर्शनात १७ डिसेंबरला शिरपूर येथून महापुरुषांच्या सन्मानार्थ यात्रेला सुरुवात झाली होती. तालुक्यातील प्रत्येक गावात यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष करून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सन्मानयात्रे दरम्यान माजी मंत्री डॉ. शिंगणे, जिल्हाध्यक्ष नाझेर काझी,दत्तात्रय लहाने यांचेसह पदाधिकारी व नागरिकांनी देखील महापुरुषांच्या विचारांचा उत्स्फूर्तपणे जागर केला. तसेच  छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलें,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोशारी,देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील आदी भाजप नेत्यांबद्दल संताप व्यक्त करून निषेध जाहीर केला.या राष्ट्रवादीच्या 'सन्मान यात्रेचा' समारोप ३१ डिसेंबरला आ.अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊळघाट येथे होणार आहे.मिटकरी यांच्या सभेला तुफान गर्दी उसळत असते. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दत्तात्रय लहाने यांनी केले आहे.