६ सरपंच पदाचा ३० ऑगस्टला फैसला! आरक्षणामुळे तीव्र चुरस !!
Aug 22, 2022, 20:11 IST
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा फैसला ३० ऑगस्टला होणार आहे. यासाठीचे आरक्षण लक्षात घेता 'गावाचा कारभारी' होण्यासाठी प्रचंड चुरस राहणार आहे.
मलकापूर तालुक्यातील आळंद, बेलाड, उमाळी तर खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर, खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतेच पार पडली. या ठिकाणच्या सरपंच पदाची निवडणूक ३० ऑगस्टला होत आहे. यातील उमाळी, आळंद, खामगाव ग्रामीणचे सरपंचपद ओबीसींसाठी तर बेलाड, पिंप्री धनगर चे खुल्या प्रवर्गासाठी आहे. यामुळे चुरस तीव्र असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. याचबरोबर खामगाव तालुक्यातील जळका भडंग च्या रिक्त सरपंच पदाची निवडणूक देखील याच बरोबर होत आहे.