खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील ५ हजार ८६६ बेघर कुटंबांना मिळणार हक्काचे पक्के घर..! आमदार आकाश फुंडकरांचा पुढाकार

 
Ffggg
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार आकाश फुंडकरांच्या पाठपुराव्यामुळे खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागा अंतर्गत येणा-या ९७ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ५ हजार ८६६ बेघर कुटुंबातील लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे. गरीब कुटुंबातील लोकांचे पक्क्या घराचे स्वप्न पुर्ण झाले आहे. ३ हजार ४१४ लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लाभर्थ्यांना घरासाठी १ लाख २० हजार रुपये देण्यात येत आहे..
खामगांव पंचायत समितीला २०१७ - १८ पासून ते २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३ हजार ९६३ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३ हजार ९६३ लाभार्थ्यांची निवड प्रतिक्षा यादीनुसार करुन त्यांना याचा लाभ देण्यात येत आहे. यापैकी २ हजार ३८७ जणांनी घरकुलाचे काम पुर्ण करून ते त्या घरात निवासासाठी गेले आहेत. तर १ हजार ५७६ लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम प्रगती पथावर आहे. रमाई आवास योजने अंतर्गत १ हजार ८४६ लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. यापैकी ९८५ लाभार्थ्यांनी बांधकाम पुर्ण केले आहे. तर ८६१ लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम प्रगतीपथावर आहे.