सिंदखेडराजात पार पडली तिसरी विधवा महिला परिषद! विधवा व घटस्फोटीत महिलांचे प्रश्न सोडविणार : आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे प्रतिपादन! प्रा. डी.एस. लहानेंच्या कामाचेही केले कौतुक;

प्रा.लहाने म्हणाले,काळानुरूप बदल स्वीकारा 

 
Hhhhs
सिंदखेड राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधवा व घटस्फोटीत महिलांचे अनेक प्रश्न समस्या आहेत, थोर समाज सुधारक महात्मा फुले यांनी या वर्गासाठी फार मोठे काम केले आहे. आम्ही सुद्धा महात्मा फुलेंचा आदर्श घेऊन विधवा व घटस्फोटीत महिलांचे प्रश्न समस्या सोडवण्याचे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

 सिंदखेड राजा येथील विधी रस्त्यावरील मातोश्री लॉन येथे विधवा परषदेचे प्रणेते डी. एस. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मानस फॉऊंडेशन व रामप्रसाद शेळके यांनी तिसरी विधवा परिषद ३० जानेवारी रोजी पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. आ. डॉ. शिंगणे पुढे म्हणाले की, विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी डी. एस. लहाने चांगले काम करीत आहेत. विधवा व घटस्फोटीत महिलांना सुद्धा समाजात मानाचे स्थान मिळायला पाहिजे. त्यांना संपत्तीत वाटा मिळत नाही, अनेक ठिकाणी त्यांचे शोषण केले जाते, शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर आहेत, संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात डी. एस. लहाने विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी मोठे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, कार्यक्रमाचे आयोजक डॉ. रामप्रसाद शेळके, शिवाजी राजेजाधव, शायना पठाण, स्वाती सावजी, प्रतिभा भुतेकर अनिता कापरे, पूनम राठोड, कल्याणी शिंगणे, मंदाताई शिगणे, जगनमामा सहाने, विजय तायडे, सतीश काळे, सिताराम चौधरी, आरेफ चौधरी आदींची उपस्थिती होती.   

काळानुरूप बदल स्वीकारा : प्रा. लहाने

काही गोष्टी काळानुरूप स्वीकाराव्या लागतात, जे लोक बदल स्वीकारतात, अशा लोकांना परिस्थितीशी जुळवून घेता येते. सध्याचा काळ हा विचित्र आहे. गावागावांमध्ये मुलांची लग्न होत नाही. २५, ४० वर्षे चय झाल्यानंतरही मुलांना मुली मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला कमी वयामध्ये विधवा झालेल्या महिलांची संख्या मोठी आहे, अशा वेळी आपण मानसिक बदल स्वीकारून नव विचारांची पेरणी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संकल्पक प्रा. डी एस लहाने यांनी केले. महिलांना विश्वास दिला, त्यांच्या मुलांना सांभाळण्याची तयारी दाखवली तर अनेक विधवा महिला लग्नासाठी तयार होतील, असेही ते म्हणाले.