सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात प्रशासकीय इमारतींसाठी ३० कोटी रुपयांचा निधी! आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश

 
rajendra shingne
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील प्रशासकीय इमारतींसाठी शासनाने जवळपास ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे.

  देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांना स्वतःची इमारत नसल्याने ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ही बाब लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या दोन्ही तालुक्यांत प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीची मागणी केली होती.त्यावेळीच हा प्रस्ताव अतींम टप्प्यात होता.परंतु सत्तांतर झाल्याने प्रस्तावावरील कार्यवाही मागे पडली. त्यानंतर आ.डॉ. शिंगणे यांनी पुन्हा या संदर्भात शासनाकडे मागणी केली.शासनाने ही मागणी मान्य केली असून दोन्ही तालुक्यामधील प्रशासकीय इमारतींसाठी जवळपास ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

    प्रशासकीय इमारतीचे बांधकाम झाल्यावर विविध शासकीय कार्यालये एकच छताखाली येणार आहेत.त्यामुळे शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार आहेत.