BREAKING नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवत यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा; कारंजा येथील तातडीच्या भेटीने बुलडाण्यात खमंग चर्चाना उधाण

 
Kyhsn
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजूनही कायम असताना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी आज तातडीने शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने चर्चा करण्यात आली. दरम्यान याचे वृत्त पसरताच बुलडाणा लोकसभा मतदारसंघात उलटसुलट चर्चाना पेव फुटले आहे.
  Add
गद्धार नेत्यांना धडा शिकवायचाच या जिद्दीने
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील ठराविक मतदार संघ पिंजून काढत आहे. सध्या ठाकरे हे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. आज बुधवारी( दि १३) कारंजा लाड व वाशिम येथे त्यांच्या सभा लावण्यात आल्या आहे. या प्रचंड व्यस्त दौऱ्यातही त्यांनी नरेंद्र खेडेकर व जालिंदर बुधवत यांची सकाळीच कारंजा लाड येथे तातडीची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या दोघासमवेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर निवडणुकीवर चर्चा केल्याचे समजते. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील विविध राजकीय विषयावर चर्चा केल्याचे सांगण्यात आले.तसेच मागील महिन्यात झालेला अर्धवट दौरा आणि मेहकरच्या सभेची संभाव्य तारीख यावरही चर्चा झाली 
 
बंद खोलीके पिछे क्या है?
 या तातडीच्या भेटीनंतर खेडेकर व बुधवत हे मेहकरात दाखल झाले. दरम्यान या भेटीमुळे महायुतीच्या नेत्यांचे कान टवकारले आहे. बुलडाण्यातून नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी पक्की झाल्याची चर्चाही सुरू झाली आहे. शिवसेना उबाठा बरोबरच मित्र व शत्रू पक्षातही या भेटी बद्धल विविध तर्क लावण्यात येत आहे. यामुळे आज दिवसभर या भेटीची व संभाव्य चर्चेवरच खमंग व उलट सुलट चर्चा रंगली.