खा . जाधवांनी अखेर सोडले मौन! कथित चांडाळ चौकडी वर डागली टीकेची तोफ; आमचा सीएम असताना आम्ही जिल्ह्यात विरोधी पक्ष! संजय राउताना दिले 'हे' मजेदार चॅलेंज..!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाबंडाला एक महिना लोटल्यावरही शांत राहणाऱ्या खा. प्रतापराव जाधव यांनी अखेर आज आपले मौन सोडले! नुसते सोडलेच नाही तर मातोश्री ते चांडाळ चौकडी वर शाब्दिक हल्ला चढवितानाच संजय राऊत याना एक मजेदार चॅलेंज देऊन त्यांनी आपल्या मनातील खदखद मोकळी केली.

 निमित्त होते ते मुख्यमंत्री अन १२ बंडखोर खासदारांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेचे! दिवसभर  आपल्या योजनांची अंमलबजावणी केल्यावर त्यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. यानंतर एका वृत्तवाहिनेने सीएम शिंदे आणि १० खासदारांची विशेष समूह मुलाखत घेतली. यावेळी प्रत्येक खासदारांशी चर्चा करण्यात आली. यावेळी खा . जाधवांनी मातोश्री वरील वाईट अनुभवाची यादीच वाचली. उद्धव साहेबांच्या आजूबाजूच्या चांडाळ चौकडीने सत्यानाश केला.

त्यांनी साहेबांना चुकीची माहिती देत दिशाभूल केली. लोकसभेतील  बोलण्याची ७० टक्के वेळ अरविंद सावंत अन विनायक राऊत हेच घ्ययचे.त्यांच्याकडे आम्ही आमचे गाऱ्हाणे मांडले पण ते साहेबांपर्यंत कधी पोहोचलेच नाही. साहेब मुख्यमंत्री झाल्यावर आमच्या जिल्ह्यात राष्टावादीचे पालकमंत्री नेमण्यात आले. त्यामुळे निधी न  मिळाल्याने सत्तेत असून जिल्ह्यात आम्ही विरोधी पक्षात होतो अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. 

राउतानी पालिका निवडणुकीत जिंकून दाखवावे..

 संजय राऊत आमच्यामुळे खासदार झाले. त्यांनी आता होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या लढतीत कोणत्याही प्रभागातून निवडून येऊन दाखवावे  असे आव्हान त्यांनी केले. या सर्वांचा परिपाक बंडात झाला असे प्रतिपादन खा. जाधव यांनी केले.