चिंता वाढविणारी बातमी... आरोग्य तज्‍ज्ञ म्हणतात, कोरोनाची तिसरी लाट तीन महिने चालणार!

 
corona
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे देशात लवकरच कोरोना पीक लेव्हलला पोहोचण्याची शक्यता आहे.

सध्या ज्या भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे तिथे ३ महिन्यांनंतर संख्या कमी होऊ लागेल, असा तज्‍ज्ञाचा अंदाज आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अतिरिक्त संचालक डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले, की देशात ५० टक्क्यांपेक्षा जास्त ओमिक्रॉन रुग्ण हे मोठ्या शहरांमध्ये आढळत आहेत. ओमिक्रॉन चा जागतिक डेटा आणि मागील ५ आठवड्यांच्या अनुभव  पाहता ओमिक्रॉन संसर्गित रुग्ण हे सौम्य आणि लक्षणे नसलेले असतात. कोरोनाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ एन. एच. अरोरा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता अधिक आहे. ही लाट तीन महिन्यांनंतर ओसरू लागेल. ओमिक्रॉन रुग्णांची संख्या जशी वाढेल तशी कोरोना रुग्ण संख्या कमी होईल, असेही ते म्हणाले.